Uncategorized

स्वामी विवेकानंद सार्व वाचनालय संग्रामपूर येथे स्वामी विवेकानंद जयंती व सावित्रीबाई फुले, माँ .जिजाऊ जयंती,सामुहिक मकर संक्रांती सोहळा उत्साहात साजरी करण्यात आली .

राजेंद्र दांडगे मुख्य संपादक महाराष्ट्र ग्रामीण लाइव्ह जनता की आवाज न्यूज 24 चॅनेल


40 वर्षापूर्वी  संग्रामपूर येथे. स्व. नारायणरावजी दांडगे यांनी त्यांच्या काही मित्रांना बरोबर घेऊन स्वामी विवेकानंद सार्व वाचनालय सुरू केले होते. अनेक वाचन प्रेमी लोकांनी तसेच विद्यार्थी वर्गाने याचा लाभ घेतला. आजही वाचनालयात आल्या नंतर दांडगे साहेबांची आठवण काढल्याशिवाय राहत नाहीत.

  1. शेवटच्या क्षणापर्यंत स्व. नारायणरावजी दांडगे यांनी वाचनालयाचे तसेच बरेच सामाजिक पदे जबाबदारीने पार पाडले.

दिनांक 17 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती व महिलांचा हळदी कुंकू सन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी गावातील बहुसंख्य महिला उपस्थितीत होत्या. हळदी कुंकू निमित्ताने वाचनालयाचे अध्यक्ष तसेच तरुण भारत चे तालुका प्रतिनिधी श्री रवींद्र दांडगे यांनी भेट वस्तू वाचनालयाच्या वतीने देण्याचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ नंदाताई खापरे यांनी केले तर आभार प्रदर्शन व सर्व महिलांना तिळगुळ व भेट वस्तू वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ सुनीताताई दांडगे यांनी केले.


Discover more from Maharashtra Gramin

Subscribe to get the latest posts sent to your email.

महाराष्ट्र ग्रामीण लाईव्ह जनता की आवाज

पत्रकार बनण्याची सुवर्ण संधी अधिकृत I'd कार्ड संपर्क राजेंद्र दांडगे मुख्य संपादक महाराष्ट्र ग्रामीण लाइव्ह जनता की आवाज न्यूज 24 चॅनेल मोबाईल 8669035637+9890304577 Youtube channel -@rajendra9821

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Discover more from Maharashtra Gramin

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading