नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शेतकरी बांधव आमरण उपोषनास बसले संग्रामपूर येथील कृषी विभागाच्या ऑफिस जवळ मंडप
शेतकरी आंदोलक श्री प्रकाश विठ्ठलराव भिसे

दिनांक 1जानेवारी नवीन वर्षाच्या सुरुवातीला अन्नदाता शेतकरी आमरण उपोषनास बसल्याची लाजीरवाणी बाब विमा कंपनी करिता आहे.
संग्रामपूर, जळगाव जामोद व शेगाव तालुक्यातील शेकडो शेतकरी बांधव आज संग्रामपूर येथे आमरण उपोषनास बसले असून कृषी विभागाच्या ऑफिस जवळ शेकडो शेतकरी आल्यामुळे काही वेळ रस्ता सुद्धा बंद झाला होता.
वातावरण पाहून तालुका कृषी अधिकारी यांनी उपोषण स्थळी भेट दिली परंतु चर्चा निष्फळ ठरल्याची माहिती आंदोलन करते श्री प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी दिली.
यावर तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सन 2024 च्या खरीप हंगामातील विमा काढलेला असून सुद्धा विमा कंपनी क्लेम देत नसल्याच्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे शेतकरी सांगत होते.
Discover more from Maharashtra Gramin
Subscribe to get the latest posts sent to your email.





