नागपूरच्या MIDC मध्ये पाण्याची टाकी कोसळून सहा मजुरांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची मदत : मुख्यमंत्री
नागपूर महाराष्ट्र ग्रामीण जनता की आवाज. प्रतिनिधी

नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसीमध्ये अवाडा कंपनीमध्ये पाण्याची टाकी कोसळल्याने सहा मजुरांचा मृत्यू झाला आहे. सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत देण्यात येणार आहे.
Nagpur प्रतिनिधी : नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसीमध्ये अवाडा कंपनीमध्ये पाण्याची टाकी कोसळल्याने सहा मजुरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता तर 11 मजूर गंभीर जखमी होते. उपचारा दरम्यान आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दुख: व्यक्त केलं आहे. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. याशिवाय, मृतांच्या वारसांना 30 लाख रुपये संबंधित कंपनी देणार आहे. तर जखमींना 10 लाख आणि उपचारांचा खर्च देण्याचेही कंपनीने मान्य केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
Discover more from Maharashtra Gramin
Subscribe to get the latest posts sent to your email.




