Uncategorized

प्राध्यापक श्री विजयजी पुंडे यांना पीएचडी पदवी प्रदान

संत नगरी शेगाव तसेच खामगाव अर्बन बँकेला मानाचा तुरा

खामगाव अर्बन बँकेला मानाचा तुरा

खामगांव अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रा. विजय पुंडे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

मलकापूर, दि. ०९ मार्च
येथील गोविंद विष्णू महाजन जुनिअर कॉलेजमध्ये कार्यरत प्रा. विजय पुंडे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत इतिहास विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
जिजामाता महाविद्यालय, बुलढाणा येथील इतिहास विभाग संशोधन केंद्रांतर्गत त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले. डॉ. नामदेव ढाले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. पुंडे यांनी “पश्चिम विदर्भातील वृत्तपत्रांची स्वातंत्र्य लढ्यातील भुमिका : एक ऐतिहासिक अध्ययन ” या विषयावर संशोधन निबंध सादर केला.
जिजामाता महाविद्यालयातील इतिहास संशोधन केंद्रात दि. ०९ मार्च रोजी घेण्यात आलेल्या खुल्या मौखिक परीक्षेनंतर त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. झालेल्या खुल्या मौखिक परीक्षेसाठी वरिष्ठ परिक्षक म्हणून वर्धा येथील यशवंत महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ.अनंत रिंढे होते तर अंतर्गत परीक्षक म्हणून जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन चांगोले, मार्गदर्शक डॉ नामदेव ढाले उपस्थित होते.
मागील २० वर्षांपासूनमलकापूर येथील गोविंद विष्णू महाजन जुनिअर कॉलेज येथे इतिहास विषयाचे अध्यापन करत असणाऱ्या प्रा. विजय पुंडे यांनी तथ्य आणि पुराव्यांच्या आधारे उत्तम निबंध सादर केला तसेच आत्मविश्वासाने मौखीक परिक्षेत सादरीकरण केलेले आहे त्यामुळे त्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानाने या विषयात आचार्य पदवी प्रदान करण्याची शिफारस बहिस्थ परिक्षक डॉ. अनंत रिंढे यांनी यावेळी केली.


Discover more from Maharashtra Gramin

Subscribe to get the latest posts sent to your email.

महाराष्ट्र ग्रामीण लाईव्ह जनता की आवाज

पत्रकार बनण्याची सुवर्ण संधी अधिकृत I'd कार्ड संपर्क राजेंद्र दांडगे मुख्य संपादक महाराष्ट्र ग्रामीण लाइव्ह जनता की आवाज न्यूज 24 चॅनेल मोबाईल 8669035637+9890304577 Youtube channel -@rajendra9821

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Discover more from Maharashtra Gramin

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading