सोनाळा येथे भाजपा महिला मोर्चाद्वारे मकर संक्रांती उत्सव साजरा.
पत्रकार बनण्याची सुवर्ण संधी अधिकृत I'd कार्ड संपर्क राजेंद्र दांडगे मुख्य संपादक महाराष्ट्र ग्रामीण लाइव्ह जनता की आवाज न्यूज 24 चॅनेल


दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सोनाळा द्वारे मकरसंक्रांत उत्सवाचे आयोजन स्थानिक महिला मोर्चाचे वतीने करण्यात आले. या दिवशी सूर्याचा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश होतो म्हणूनच या सणाला मकर संक्रांत असे म्हटले जाते. लोक एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतात. हा सण आनंद परस्पर प्रेम व समरसतेचा संदेश देतो. सालाबदाप्रमाणे २५ जानेवारी रथसप्तमीच्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता सोनाळा येथील महादेव मठ येथे हा मकर संक्रांती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हळदीकुंकू साठी स्थानिक सोनाळा शहरातून ६४८ महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुरुवातीला ग्रामदैवत श्री संत सोनाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन जेष्ठ कार्यकर्त्या सौ.अर्चनाताई देशमुख सौ.लताताई भुतडा सौ. सुमनताई घट्टे यांच्या हस्ते करण्यात आले.हळदी कुंकवाचे निमित्ताने सर्व महिलांचे एकत्रीकरण होऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सौ.ज्योतीताई खोकले, सौ.वैशालीताई बोदडे,सौ.शीलाताई कुकडे,सौ.ज्योतीताई लव्हाळे,सौ. शुभांगीताई लव्हाळे,सौ.रेखाताई गोतमारे,सौ.सुनिताताई खोद्रे,सौ. पुजाताई ठोकणे,सौ.दर्शनाताई दांडगे,सौ.सविताताई तारू यांनी अथक परिश्रम घेतले.
पत्रकार बनण्याची सुवर्ण संधी अधिकृत I’d कार्ड संपर्क राजेंद्र दांडगे मुख्य संपादक महाराष्ट्र ग्रामीण लाइव्ह जनता की आवाज न्यूज 24 चॅनेल
9890304577,8669035637






