क्रांतीज्योती विद्यालय…’ सिनेमाची 9व्या दिवशीही यशस्वी घोडदौड, इंग्रजी माध्यमाच्या मुलांचीही थिएटरमध्ये गर्दी
महाराष्ट्र ग्रामीण लाइव्ह जनता की आवाज न्यूज 24 चॅनेल

क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा रिलीज होऊन 9 दिवसांचा कालावधी उलटला असून या सिनेमाने किती कमाई केली ते जाणून घ्या.
क्रांतीज्योती विद्यालय…’ सिनेमाची 9व्या दिवशीही यशस्वी घोडदौड, इंग्रजी माध्यमाच्या मुलांचीही थिएटरमध्ये गर्दी
क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमाने नवव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल 62 लाख रुपये कमावले. आजपासून वीकेंड सुरू होत असल्यामुळे कमाईची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या सिनेमाने पहिल्या आठवड्यात एकूण 5.75 कोटींचा गल्ला जमवला होता. तर संपूर्ण नऊ दिवसांमध्ये सिनेमाने तब्बल 6. 14 कोटींची घसघशीत कमाई केली आहे.
चित्रपटाच्या टीमने महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन सिनेमाचे प्रमोशन केले होते. या काळात अनेक कलाकारांनी सुद्धा त्यांच्या शाळेच्या आठवणी जागा केल्या. आता सुद्धा बरेच जण आपल्या शाळेतल्या मित्रमंडळींसह हा सिनेमा पाहण्यासाठी जात आहे.
क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या सुपरहिट मराठी चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग निर्माती आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत. सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी या सिनेमातून पहिल्यांदाचमराठीत काम करत आहे. तसेच रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर या नवरा बायकोच्या जोडीने या सिनेमातील स्वर्गात आकाशगंगा या गाण्याचा आवाज दिलाय.








