खामगाव न्यूज प्रतिनिधी दत्तात्रय कुलकर्णी. समाजनिष्ठा चे संपादक बळीराम वानखडे यांना प्रेस क्लब खामगाव चा बाळशास्त्री जांभेकर जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे.पत्रकार दिनानिमीत्य ६ जानेवारी २६ रोजी कोल्हटकर स्मारक मंदिर खामगाव येथे दुपारी साडे चार आयोजीत पुरस्कार वितरण सोहळ्यात सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
नामदार प्रतापराव जाधव, नामदार आकाशदादा फुंडकर यांच्या सह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडणार आहे. बळीराम वानखडे यांची ४० वर्षाची पत्रकारितेत त्यांचा २५ वर्षाचा कार्यकाळ देशोन्नती मध्ये तालुका प्रतिनिधी म्हणून बुलडाणा आवृत्ती संपादक राजेशजी राजोरे यांच्या सानिध्यात पार पडला. शिरसगाव देशमुख चे माजी सरपंच तसेच नामदार भाऊसाहेब फुंडकर यांचे पी. आर. ओ. राहिलेले आहेत.त्यांना प्रेस क्लब ने पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अधिकृत पत्र दिले असून याबद्दल समाजनिष्ठा चे संपादक बळीराम वानखडे यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.यापूर्वी खामगाव प्रेस क्लब ने स्वर्गीय बाळासाहेब बिंनिवाले पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे समाजनिष्ठा आणि बळीराम वानखडे यांच्या वर प्रेम करण्याऱ्यांनी शेकडो च्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन बळीराम वानखडे यांनी केले आहे.








