Holiday News: राज्यातील 29 शहरांमध्ये 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; वाचा शहरांची संपूर्ण यादी
राजेंद्र दांडगे मुख्य संपादक महाराष्ट्र ग्रामीण लाइव्ह न्यूज 24

Holiday on 15 January : राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, ही सुट्टी केवळ सरकारी कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नाही. ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे, परंतु ते त्यांच्या निवडणूक क्षेत्राबाहेर काम करत आहेत, अशा कर्मचाऱ्यांनाही मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत दिली जाणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाने 6 जानेवारी, 2026 रोजी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना (Gazette) प्रसिद्ध केली. ही सुट्टी परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 (Negotiable Instruments Act, 1881) च्या कलम 25 अंतर्गत जाहीर करण्यात आली असून, ती बँका आणि सर्व सरकारी व निमसरकारी कार्यालयांना लागू राहील.
कोणाकोणाला मिळणार सुट्टीचा लाभ?
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, ही सुट्टी केवळ सरकारी कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नाही. ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे, परंतु ते त्यांच्या निवडणूक क्षेत्राबाहेर काम करत आहेत, अशा कर्मचाऱ्यांनाही मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत दिली जाणार आहे.
खासगी आस्थापना, कारखाने आणि आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नाही, अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान 2 ते 3 तासांची सवलत देणे आवश्यक असेल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.








