क्राइममहाराष्ट्र

धक्कादायक! डोक्यावर आणि कंबरेवर फरशीने केले वार, येरवडा कारागृहात आरोपींमध्ये हाणामारी, एका आरोपीचा मृत्यू

आशुतोष दांडगे, पुणे प्रतिनिधी

पुण्यातील येरवडा कारागृहातच (Yerwada jail) हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हाणामारीत एका आरोपीचा मृत्यू झाला आहे.

Pune Crime news : पुण्यातील येरवडा कारागृहातच (Yerwada jail) हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हाणामारीत एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. 15 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात एका आरोपीला मारहाण झाली होती. बराक क्रमांक 1 मध्ये आरोपीला मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये विशाल कांबळे अस मृत पावलेल्या आरोपीचे नाव आहे.

विशाल कांबळे याच्या डोक्यावर व कंबरेवर फरशीने वार करण्यात आले होते. आकाश चंडालिया आणि दीपक रेड्डी असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. विशाल कांबळे याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. येरवडा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

महाराष्ट्र ग्रामीण

पत्रकार बनण्याची सुवर्ण संधी अधिकृत I'd कार्ड संपर्क राजेंद्र दांडगे मुख्य संपादक महाराष्ट्र ग्रामीण लाइव्ह जनता की आवाज न्यूज 24 चॅनेल मोबाईल 8669035637+9890304577 Youtube channel -@rajendra9821

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!