फगवा सम्मेलन वसाडी
प्रतिनिधी नेमणे आहे महाराष्ट्र ग्रामीण लाईव्ह जनता की आवाज न्यूज 24 संपर्क राजेंद्र दांडगे मुख्य संपादक 9890304577,8669035637

*आदिवासी म्हणजे आदी सत्य सनातन हिंदु धर्माचे वासी*..श्री.संत रामचरण महाराज
(१४ मार्च रोजी वसाली येथे भव्य फगवा संमेलन संपन्न)
आदिवासी म्हणजे आदि सत्य सनातन हिंदु धर्माचे वासी आहेत असे प्रतिपादन शबरीधाम अंबा आश्रम मध्य प्रदेश येथील श्री संत रामचरण महाराज यांनी फगवा संमेलनात काढले.सदर संमेलन होळी नंतर फगवा एक लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो.हे भव्य फगवा संमेलन १४ मार्च रोजी वसाली ता.संग्रामपूर येथे वनवासी सेवा समिती जामोद व फगवा उत्सव समिती वसाली द्वारा आयोजित केले होते.दुपारी १२ वाजता वीर हनुमान जी यांचे आरती नंतर हनुमान मंदिरा समोर कार्यक्रमाला सुरुवात झाली.पुढे संत रामचरण महाराज म्हणाले की,आदिवासी बंधू भगिनी प्रभू श्रीराम,भगवान श्रीकृष्ण,भगवान भोलेनाथ यांचे वंशज आहेत.आम्ही वनात राहतो म्हणून आम्हाला वनवासी सुध्दा म्हणतात.आम्हाला आमचा सनातन हिंदु धर्म अतिशय प्रिय आहे. ‘कंधो से उची छाती नही होती,धर्म से बडी कोई जाती नही होती दीपक ही नही बचा तो बाती का क्या करोगे,सनातन हिंदू धर्म ही नही बचा तो जाती का क्या करोगे’ हिंदू धर्मावर होणाऱ्या आक्रमणाबाबत त्यांनी सगळ्यांना सतर्क राहण्याबाबत सांगितले.जे भारत मातेला आपली माता मानत नाहीत ते आमचे नाहीत.ख्रिश्चन मिशनरी यांना गावात प्रवेश करू देऊ नका,त्यांच्या शाळेत आपल्या मुला मुलींना पाठवू नका.अन्य धर्मीय लोकांच्या काळ्या कारवायाकडे लक्ष द्या,स्वतःच्या धर्मात मरण आले तरी बेहत्तर परंतु पर धर्म स्वीकारू नका असे आवाहन त्यांनी केले.२२ मे रोजी दिल्ली लाल किल्ला येथे आयोजित संघ परिवार क्षेत्राच्या डिलीस्टिंग मोर्चा मधे सामील होण्या बाबत त्यांनी सूचना केली.यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष वनवासी सेवा समिती जामोद चे अध्यक्ष गणेश जी नथ्थाणी हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून वि.हि.प.चे विदर्भ प्रांत संघटन मंत्री विष्णूजी देशमुख,बुलढाणा विभाग संघचालक चित्तरंजनजी राठी खामगाव जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे,वनवासी कल्याण आश्रमाचे गजाननराव सोलकर, वि.हि.प.चे राजेशजी झापर्डे,गोविन्दजी बर्डे आदी मान्यवर मंचावर होते.प्रमुख वक्ते देशमुख म्हणाले की स्वामी विवेकानंदांनी सांगितल्यानुसार हिंदु धर्मातून एक संख्या कमी झाली तर एक संख्या कमी होत नाही तर एक शत्रू वाढतो त्यामुळे देव देश धर्म कार्यासाठी सगळ्यांनी एकत्रित यावे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र बोदडे,आभार प्रदर्शन राजूभाऊ गांधी यांनी केले.या कार्यक्रमाला वसाडी येथील सरपंच सिकंदर बाबर,मिलिंदजी जोशी, सचिनभाऊ देशमुख,प्रकाश बोदडे, प्रदीपभाऊ भुतडा,ओमजी संघवै,विश्वासभाऊ पाटील,विजय दहीकर,भाऊराव पाटील,शालिग्राम मानकर,रामेश्वर चोरे,अतुलजी बनारसे,विष्णू खडसे,जगदीशप्रसाद तिवारी,मगन माली,सोहन डूडवा, धनसिंग,कालू रावत व विश्व हिंदु परिषद,बजरंग दल,वनवासी कल्याण आश्रम,भारतीय मजदूर संघ व परीवार क्षेत्रातील विविध आयामाचे शेकडो कार्यकर्ते व हजारो चे वर वनवासी बंधू भगिनी उपस्थित होत्या.

Discover more from Maharashtra Gramin
Subscribe to get the latest posts sent to your email.






