फगवा उत्सवाला हजारोच्या संख्येने उपस्थित व्हा राजूभाऊ गांधी
प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क राजेंद्र दांडगे मुख्य संपादक महाराष्ट्र ग्रामीण लाईव्ह जनता की आवाज न्यूज 24 9890304577

१४ मार्च रोजी फगवा संमेलन होणार.. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा वसाली तालुका संग्रामपूर येथे होणाऱ्या ४२ भव्य फगवा संमेलनाला हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य तथा वनवासी सेवा समिती चे उपाध्यक्ष राजुभाऊ गांधी यांनी वसाली येथे आयोजित भव्य फगवा संमेलनाच्या नियोजन बैठकीत केलें ही बैठक ३ मार्च मंगळवार रोजी रात्री ८ वाजता स्थानिक हनुमान मंदिर वसाली येथे झाली.वनवासी सेवा समिती जामोद व फॅगवा उत्सव समिती वसाली द्वारा हे भव्य फॅगवा संमेलन घेतले जाते हे ४२ वे वर्ष आहे.थोर सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक स्व.घनशामदासजी गांधी, पूर्व जिल्हा संघचालक स्व.अजाबराव बाप्पू देशमुख,खामगांव अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष स्व.बयस गुरुजी यांचे मार्गदर्शनातून या संमेलनाला सुरुवात झाली.वनवासी बांधवांच्या सांस्कृतिक परंपरा लोकनृत्य ढोल ताशे वंशी पारंपरिक पद्धतीचे पोशाख आदींचे दर्शन या महोत्सवात होते.होळी नंतर चे पहिले रविवारी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते परंतु या वेळी १४ मार्च शनिवारी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाला विर हनुमानजींचे आरतीने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे वनवासी क्षेत्रात सेवा कार्य करणारे साधू संतांचे मार्गदर्शन यावेळी सर्वांना होणार आहे सोबतच धनुर्विद्या स्पर्धा व विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल यावेळी सातपुडा पर्वत परिसरातील हजारोंचे संख्येने वनवासी बांधव तसेच विदर्भातील शेकडो चे संख्येने संघ परिवार क्षेत्रातील कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील या बैठकीला राजूभाऊ गांधी उपाध्यक्ष सेवा समिती जामोद,भारतीय मजदूर संघाचे प्रकाश बोदडे भाजपा जिल्हा कार्य.सदस्य प्रदिप भूतडा, विश्वासराव वरणकार अध्यक्ष संग्रामपूर खरेदी विक्री संस्था,फगवा उत्सव समिती चे शालिग्राम मानकर,विजय दहिकर,रामेश्वर चोरे, मगन माळी, सोहन डूडवा,कालू रावत व वसाली येथील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Discover more from Maharashtra Gramin
Subscribe to get the latest posts sent to your email.






