कामगारांचे 12 तास करण्याच्या शासन निर्णयाला भारतीय मजदुर संघाकडून कडाडून विरोध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
महाराष्ट्र शासनाने शासकीय तथा खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या कामाच्या वेळेत बदल करून 8 तासावरून 12 तास करण्याचा विचार करत असल्याची माहिती विविध वृत्तपत्रातून प्राप्त झाली आहे.
भारतीय मजदूर संघ या निर्णयाचा कडाडून विरोध करीत आहे.
हा निर्णय पूर्णपणे कामगार विरोधी आहे
आंतरराष्ट्रीय कामगार संघटना( ILO ) ने ठरवून दिलेल्या कामगार मानकांना हा निर्णय प्रतिकूल आहे
बारा तासाचा कामाचा बोजा कामगारांच्या आरोग्यावर कौटुंबिक जीवनावर आणि सामाजिक समतोलावर घातक परिणाम करणारा आहे
म्हणून भारतीय मजदूर संघ
महाराष्ट्र शासनाकडे 8 तासावरून 12 तास वेळ वाढविण्याचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा
अशा महत्त्वाच्या विषयावर भारतीय मजदूर संघासह प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांसोबत तात्काळ बैठक घेऊन चर्चा करावी
व सत्य परिस्थिती अवगत करावी
जर हा निर्णय मागे घेण्यात आला नाही तर भारतीय मजदूर संघ महाराष्ट्रात इतर समविचारी संघटनांना सोबत घेऊन भव्य आंदोलन उभारण्यास बाध्य होईल
भारतीय मजदूर संघ या निर्णयाचा तीव्र विरोध करीत असून शासनाने कामगार हिताचे रक्षण करण्यासाठी तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी.
गजानन गटलेवार.
प्रदेश महामंत्री, BMS