
खामगांव-जालना नवीन रेल्वेमार्गाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल..!
केंद्रिय रेल्वेमंत्री मा.श्री.आश्विनी वैष्णव जी यांची भेट घेऊन या अर्थसंकल्पात रेल्वे प्रकल्पावर निधी उपलब्ध करून देण्याची केली आग्रही मागणी..!
इंग्रज काळापासुन बहुप्रतिक्षीत असलेल्या आणि राज्य सरकारने 50 % खर्चाला मंजुरात दिलेल्या खामगांव-जालना रेल्वे मार्गाच्या कामावर या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी केंद्रिय रेल्वेमंत्री मा.श्री.आश्विनी वैष्णव जी यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.
इंग्रजकाळापासुन प्रलंबीत असलेला खामगांव-जालना हा रेल्वे मार्ग व्हावा अशी अपेक्षा बुलढाणा लोकसभा मतदार संघातील नागरीकांची आहे. या संदर्भात 2014 मध्ये पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांनी खामगांव येथे झालेल्या जाहीर सभेत हा प्रकल्प जलद गतीने पुर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. महाराष्ट्र सरकारने 15 मार्च 2024 रोजी या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या 50 % खर्चाच्या मान्यतेला मंजुरात प्रदान करुन हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाकडे पाठविला आहे.
यावेळी माझ्या समवेत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील,श्री.विद्याधरजी महाले,डॉ.आशुतोष गुप्ता,श्री .गोपाल तुपकर ,शेख अनिस शेख बुढन,श्री. रेणुकादास मुळे,डॉ.किशोर वळसे उपस्थित होते.
रेल्वेमंत्र्याच्या भेटी दरम्यान दिलेल्या या पत्रात त्यांनी नमुद केले आहे की, बुलढाणा जिल्हयातील खामगांव-जालना रेल्वे मार्ग व्हावा अशी माझ्यासह जिल्ह्यातील नागरीकांची अपेक्षा आहे. हा मुद्दा विकासासोबतच लोकभावनेचा सुध्दा आहे. हा रेल्वे मार्ग विदर्भ मराठवाडा या दोन विभागांना जोडणारा आहे. शिवाय मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वे मार्गांनाही जोडणारा ठरणार असुन सध्या प्रलचित असलेल्या मध्यरेल्वे आणि दक्षिण रेल्वे मार्गातील अंतर कमी करणारा ठरणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ आहे. लोणार येथे खाऱ्या पाण्याचे जगविख्यात सरोवर आहे. तर शेगांव येथे श्री.संत गजानन महाराजांचे समाधी स्थळ आहे. या एैतीहासीक,धार्मीक, आणि पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी देश विदेशातुन पर्यटक येत असतात. या रेल्वे मार्गामुळे व्यापार पर्यटन आणि कृषी उत्पादनासोबतच औद्योगीक विकासाला चालना देणारा ठरणार आहे. या रेल्वेमार्गासंदर्भात रेल्वे लोक आंदोलन समितीचे सदस्य,जिल्हयातील नागरीक,विविध सामाजीक संघटना, लोकप्रतिनीधी मला भेटतात.आणि खामगांव-जालना रेल्वे मार्गासंदर्भात आस्थेने विचारपुस करतात. हा मार्ग अनेक दिवसापासुन प्रलंबित असल्याबद्दल चिंताही व्यक्त करतात. आपले सरकार सबका साथ सबका विकास करणारे सरकार असल्याने येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये खामगांव-जालना रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी या भेटी दरम्यान रेल्वेमंत्री मा.श्री.आश्विनी वैष्णव जी यांच्याकडे केली आहे. या मागणीला रेल्वेमंत्र्यांनीही सकारत्मकता दर्शविली आहे.
#PratapraoJadhav #Shivsena #Buldhana
Discover more from Maharashtra Gramin
Subscribe to get the latest posts sent to your email.







