महाराष्ट्र
BMC Election: जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
BMC Election

BMC Election 2026: जिथे शिवसेना जिंकली ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने जागावाटपासाठी नवा फॉर्म्युला आणल्याने शिंदे सेना बुचकाळ्यात पडली. शिवसेना-भाजपची जागावाटपाची चर्चा

BMC Election Shivsena Shinde Camp & BJP Seat Sharing: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटातील जागावाटपासाठी गुरुवारी दुसरी बैठक पार पडत आहे. मुंबईच्या दादर परिसरातील भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात ही जागावाटपाची चर्चा होणार आहे. मात्र, या बैठकीपूर्वी जागावाटपासाठी भाजपने (BJP) अवलंबिलेल्या नव्या पॅटर्नची जोरदार चर्चा रंगली आहे. एकीकडे शिंदे गटाकडून 227 पैकी निम्म्या जागांची मागणी केली जात असताना भाजपने उलट गेल्या निवडणुकीत शिवसेनेने जिंकलेल्या जागांवरही दावा सांगितला आहे.





