बुलडाणा येथून सुरू झालेल्या एका मोठ्या पत संस्थेत!
महाराष्ट्र ग्रामीण जनता की आवाज लाइव्ह न्यूज चॅनेल
नियमबाह्य कर्ज वाटप कोट्यवधीचा घोटाळा
सीईओंचा अचानक राजीनामा… तसेच इतर कर्मचारीही संस्था सोडून देण्याचे तयारीत.
सदर पतसंस्थेची सखोल चौकशी व्हावी.
पुणे प्रतिनिधी- हजारो कोटी ठेवी असलेल्या आणि नियमबाह्य हजारो कोटी रुपये कर्ज वाटप झालेल्या तसेच बुलढाणा येथून सुरू झालेल्या अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या पुणे ऑफीसमध्ये मोठा प्रशासकीय भूकंप झाल्याची चर्चा सुरु आहे. आतापर्यंत संस्थेची धुरा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात सांभाळण्याचे काम करणारे तसेच संस्थेच्या स्थापनेपासूनच कार्यरत असलेल्या सीईओ ने अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ह्या राजीनाम्यामुळे संस्थेत मोठी खळबळ उडाली असून, अनेक कर्मचारी देखील संस्था सोडण्याच्या तयारीत असल्याचे समजते. ह्या प्रकारामुळे पतसंस्थेत काहीतरी मोठी गडबड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ह्याबाबत माहिती अशी की,बुलढाणा येथील एका बलाढ्य व राजकारणाशी संबंधअसणा- मोठ्या व्यापा-याने सुमारे 35 वर्षांपूर्वी ह्या बुलडाणा अर्बन को.आॕप,सह. पतसंस्थेची स्थापना केली आहे. तेंव्हापासून एकाच परिवारातील आणि जवळचाच व्यक्ती (विद्यमान सीईओ) यांचेच या बँकेवर वर्चस्व राहिलेले आहे.
गेल्या 35 वर्षांत या बँकेत आतल्या आत अनेक प्रकारचे घोटाळे झालेले आहेत. या घोटाळ्यांची नेहमीच चर्चा होत असते, परंतु प्रत्येक वेळी संस्थापक आणि त्यांचे सहकारी घोटाळे पद्धतशीरपणे मॅनेज करीत असतात. ह्यापूर्वी काही वृत्तपत्र व मीडिया मधून घोटाळ्यांना उजागर केले होते.
ह्या पतसंस्थेच्या अनेक शाखांमध्ये आजवर घोटाळे मॅनेज करण्यात भलेही व्यवस्थापनाला यश आले असावे, परंतु गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील कार्यालयात चाललेल्या घोटाळ्यांवर अध्यक्षांचे नियंत्रण राहत नसल्याचे दिसत आहे. सीईओ हे अत्यंत बेमालूमपणे घोटाळे करीत असल्याची खात्रीशिर माहिती पुण्याच्या वर्तुळात व्यक्त होत आहे.
जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये संबंधित पतसंस्थेचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत. एका माहितीनुसार हा व्यवहार अनेकांच्या अंगलट आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून संस्थापक आणि सीईओ यांच्यात चांगलेच बिनसल्याचे दिसत आहे. या बिनसण्यामागे बँकेत झालेला कोणतातरी मोठा घोटाळा असण्याची शक्यता आहे. सीईओ गेल्या अनेक वर्षांपासून संस्थापकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत आहे.
तसेच संस्थापक अध्यक्ष केवळ आपली मुलगी आणि जावयाला झुकते माप देत असल्याची सीईओंची खंत आहे. सीईओंनी अनेक वर्षे पतसंस्थेवर आपले वर्चस्व येण्याची वाट पाहिली. अखेर सीईओचाही बांध सुटला अन् संस्थापकही वैतागला, त्यामुळे अखेर या प्रकरणाची परिणती ही सीईओंच्या राजीनाम्यात झाली आहे.
या पतसंस्थेत आजवर कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेले आहेत. अनेक कर्ज प्रकरणे नियमबाह्य जिल्ह्यासह इतर भागातही झाले आहेत. संस्थापक, त्याचे कुटुंबीय आणि त्यांचे काही जवळचे हस्तक यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून स्वत:च्या गडगंज संपत्ती बनवून ठेवल्या आहेत. ह्यात सीईओदेखील मागे नाही. सीईओंनी पण घोटाळ्यांची मोठी मालिकाच राबवलेली आहे.
सीईओकडून दिला गेलेला राजीनामा हा सुद्धा अत्यंत गंभीर बाब मानला जात आहे. पतसंस्थेत चाललेल्या घोटाळ्यांचा कुठेतरी मोठा स्फोट होणार यात शंका नाही.
बुलडाणा न्यूज/त्यामुळे आता पतसंस्थेशी निगडित ठेवीदार व खातेदारांनी याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच ह्यापूर्वी संग्रामपूर तालुक्यातील राठी नामक व्यापा-याची फसवणूक झाली आहे, तसेच मोताळा येथे सुद्धा फसवणूक झाल्या प्रकरणी उपोषण सुरु आहे.त्यामुळे ह्या पतसंस्थेची निपक्षपणे चौकशी होवून सर्व संबधितावर कारवाई व्हावी अशी जनतेत चर्चा सुरू झाली आहे.





पत्रकार बनण्याची सुवर्ण संधी, अधिकृत I’d Card, आवश्यक कागदपत्रे.
2 फोटो, आधार कार्ड, इंग्रजी, मराठी, हिंदी, पैकी, कोणत्याही भाषेत, लिहिणे व वाचणे, यायला आवश्यक.
तर आजच संपर्क करा.
राजेंद्र दांडगे,मुख्य संपादक ,महाराष्ट्र ग्रामीण,जनता की आवाज, लाइव्ह 24 .मोबाईल 9890304577